पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
अतिशय सौंदर्यसंपन्न अशा अभिनेत्रींच्या रांगेत 'स्मिता पाटील' हे नांव फिल्मी राजवटीत जरा आडवळणाच वाटत असलं तरी ते नांव समोर येताच आजही त्या सावळ्या मादक रुपाची ,त्या भेदक खोल काळ्याभोर डोळ्यांची, साध्याशाच पण उठावदार वेशभुषेची जिने समस्त रसिकजनांवर भुरळ घातली ,मला वाटत नाही तिला कोणी आजही विसरु शकले असतील. आपल्या अभिनयाने खिळवून ठेवणार्या स्मिताला खरे तर आपण अभिनेत्री होऊ असे कदापिही वाटले नाही कारण तिच्या मनात तशी महत्त्वाकांक्षाच नव्हती. सुरुवातिला दूरदर्शनवर बातम्या देणे हाच तो काय पडद्याशी, तिचा आलेला संबंध!....              सावळेपण म्हणजे शुद्ध भारतियपण !जे अतिशय देखणं असु शकतं हे कळलच मुळात स्मितामुळे.कदाचित् गोरेपणाला अतिमहत्त्व देणार्या या आपल्या देशात आणि या इंडस्ट्रीतही  आपल्या या रंगाला उजळ माथ्याने मिरवणारी ही तेज तर्रार अभिनेत्री रसिकांना लाभावी हे रसिकांच भाग्यच  म्हणाव लागेल!.....      स्मिताला स्वतःच्या सडसडीत बांध्यांचा विलक्षण अभिमान होता.आणि आपल्या काळ्याभोर डोळ्यात जणू सगळच सामावण्याची ताकद  होती....

करोना के साइडइफेक्ट्स

इमेज
अगं आई....!.                                       काय गं....                                             मी नाही गं.....                                     अगं वेळ आली   अगं आई....!.                                       काय गं....                                             मी नाही गं.....                                     अगं वेळ आली की मी करीन गं सगळं...........

हायकू

गंध मातीचा हिरवी मखमल आनंद गाणे नभी चांदणे फुलांची बरसात नक्षत्रांचे देणे सुर मल्हार  चिंबचिंब भिजुनी अंगी गारवा नीळे आभाळ टाळमृदंगाची साथ नाद विठ्ठल एकटा रस्ता नागमोडी वळण आयुष्य गीत आम्र मोहोर कोकीळेचे कुंजन आला वसंत! चांदणी रात्र  लखलखता चंद्र प्रकाश गाणे. 

पुस्तक!

इमेज
अथांग सागरासारखा तू  पोहचला आहेस क्षितिजापर्यंत                लाटांचे एक एक पान      उलटत यावे किनार्यापर्यंत तुझ्यातला खजिना शोधण्यासाठी  हवी  नजर  चोखंदळ शोधकाची,  वा बसावे किनारी स्तब्ध होऊन   गाजेतील अर्थ शोधण्याची     सहज गवसले जे शिंपले मोती  ते मी जपले जिवापल्याड  शब्द-अर्थाचे कोंदण लेऊन  अजुनही  साथ  देती मला                अजुनही साथ देती मला. x