हायकू

गंध मातीचा
हिरवी मखमल
आनंद गाणे

नभी चांदणे
फुलांची बरसात
नक्षत्रांचे देणे

सुर मल्हार
 चिंबचिंब भिजुनी
अंगी गारवा

नीळे आभाळ
टाळमृदंगाची साथ
नाद विठ्ठल

एकटा रस्ता
नागमोडी वळण
आयुष्य गीत

आम्र मोहोर
कोकीळेचे कुंजन
आला वसंत!

चांदणी रात्र 
लखलखता चंद्र
प्रकाश गाणे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुस्तक!