पुस्तक!

अथांग सागरासारखा तू 


पोहचला आहेस क्षितिजापर्यंत

              
लाटांचे एक एक पान

    


उलटत यावे किनार्यापर्यंत


तुझ्यातला खजिना शोधण्यासाठी


 हवी  नजर  चोखंदळ शोधकाची,


 वा बसावे किनारी स्तब्ध होऊन



  गाजेतील अर्थ शोधण्याची    



सहज गवसले जे शिंपले मोती



 ते मी जपले जिवापल्याड



 शब्द-अर्थाचे कोंदण लेऊन



 अजुनही  साथ  देती मला         



      अजुनही साथ देती मला.




x

टिप्पण्या

  1. छानच झाला ब्लॉग. अथांग महासागर 👌. कविता आवडली

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हायकू